ताक पिण्याचे फायदे...
जाणुन घेवुयात ताक पिण्याचे फायदे.
-इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचा मुबलक साठा असल्याने ताकामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. तसेच पोटामधील मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करते.
-शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.
- उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने अॅसिडिटी बरी होते.
- ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत. अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो.
- ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
- ताकामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होते.
- वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
- दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
- ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
- थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
- रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
Comments
Post a Comment